
द्राक्ष उत्पादनामध्ये “खरड छाटणी” ही एक अत्यंत महत्त्वाची छाटणी द्राक्ष पीक व्यवस्थापनात असते. विशेषतः उशिरा खरड छाटणी केलेल्या बागेत फुटींचा एकसंध व एकसारखी फुट येणे अपेक्षित असते. परंतु अनेक वेळा बागायतदारांच्या अनुभवानुसार असे दिसते की, काही ओलांडेमध्ये फुटी लवकर येतात, तर काहींमध्ये उशिरा – म्हणजेच फुटी मागे-पुढे फुटत असतात. या असमान फुटीमुळे द्राक्ष बागेतील फुटीवर प्रतिकूल परिणाम होत असतो.
द्राक्ष बागेची खरड छाटणी केल्यानंतर येणाऱ्या फुटी आहे त्या उत्पादनावरती मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात एकसारखी न फुटलेले बाग पुढे जाऊन एकसारखी काडी तयार होण्यामध्ये मोठी अडचण तयार करत असते मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत एक सारखे घड निर्मिती न होणे एकसारखी काडीची साईज न मिळणे यासारख्या समस्या निर्माण करते द्राक्ष बागेत भाग एकसारखे फुटण्यासाठी यावरती उपाय योजना करावे लागत असतात सदर लेखांमध्ये आपण द्राक्ष बाग एकसारखी फूट न येण्यास कोणकोणती कारणे आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया
1. छाटणीतील वेळेचा फरक
जर एकाच बागेत छाटणी टप्प्याटप्प्याने झाली असते अशा बागेत, म्हणजे काही द्राक्ष वेलीची छाटणी अगोदर तर काहींची नंतर काही द्राक्ष वेलीची छाटणी झाली असेल, तर यामुळे नैसर्गिकरीत्या फुटी मागे-पुढे येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो संपूर्ण बाग एकाच वेळेस छाटणे गरजेचे असते.
2. द्राक्ष वेलीतील अन्नसाठा
द्राक्ष वेलीचा विचार केला तर वेलीमधील असलेला अन्नसाठा हा द्राक्ष फुटीच्या वाढीवर आणि फुटण्यावर मोठा परिणाम करत असतात. हा अन्नसाठा द्राक्ष वेलीच्या वेगवेगळ्या भागात साठवलेला असतो पण जेव्हा द्राक्ष बागेची हार्वेस्टिंग होते त्यावेळी खुडलेल्या घडातून हा अन्न साठा वाया जातो मग ह्या परीस्थित द्राक्ष बागेत पुन्हा नवीन अन्नसाठा होणे गरजेचे असते पण द्राक्ष बागेत तो पुन्हा न झाल्याने द्राक्ष वेली माघे पुढे फुटत असतात.
3. द्राक्ष वेलीला न मिळालेली विश्रांती
द्राक्ष बाग हार्वेस्टिंग झाल्या नंतर लगेच छाटणीचा निर्णय बऱ्याच वेळा घेतला जातो. पण अशा वेळी द्राक्षवेलीचे पाने थकलेली असतील वेलीतील अन्नसाठा पूर्ण कमी झालेला असेल तर द्राक्ष वेली अशक्त बनतात. आणि त्या तशाच छांटणी केल्यास त्या माघे- पुढे फुटत असतात
4. द्राक्ष वेलीला पाण्याचा ताण
द्राक्ष बाग छाटणी केल्यानंतर द्राक्ष वेलीला फुटण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यावेळी बोधामध्ये व्यवस्थित ओलावा नसेल तर द्राक्ष वेली छाटणीनंतर माघे पुढे फुटत असतात. अशा वेळी द्राक्ष वेलींना पुरसे पाणी देणे गरजेचे असते. बोधामध्ये सतत वापसा राहील ह्याची काळजी घेणे गरजेचे असते तसे न झाल्यास द्राक्ष वेलींच्या फुटीवर परीणाम झालेला दिसून येतो
6. द्राक्ष वेलीची चुकीची खरड छाटणी
द्राक्ष वेलीची खरड छाटणी करताना जर चुकीच्या पद्धतीने छाटणी झाली तर त्याचा परिणाम फुटीवर दिसून येत असतो. द्राक्ष वेलीची खरड छाटणी करताना एक ते दोन डोळ ठेवून छाटणी करण्याची पद्धत आहे. पण अशा वेळी जर खरडून छाटणी केली जात असेल तर ती द्राक्ष बाग माघे पुढे फुटून येत असते.
7. द्राक्ष वेलीच्या मुळावरील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव
काहीवेळा फुटी उशिरा फुटण्याचे मूळ कारण जमिनीतील मुळावरील बुरशीजन्य रोग (जसे की फ्युजेरियम, फाइटोफ्थोरा) असू शकतात. त्याचे निदान लवकर होत नाही.त्यासाठी मुळांचे निरिक्षण करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
8. द्राक्ष जातीचा फुटण्यातील फरक
वेगवेगळ्या द्राक्ष जातीमध्ये फुटी येण्याची पद्धत वेग वेगळी असते. उदाहरणार्थ, थॉम्पसन सिडलेस जात तुलनेने लवकर प्रतिसाद देतो, तर काही जातीमध्ये थोडा उशीरा फुटी येत असतात. तसेच वेलीचीची वयाची अवस्था देखील यावर परिणाम करत असते.
9. छाटणी वेळी तापमानातील फरक
उशिरा छाटणीच्या कालावधीत हवामानात अचानक झालेला बदल (थंडी वाढणे, पाऊस येणे, कोरडे हवामान , वाढलेली उष्णता) झाल्यास फुटीला फुटण्यास वेळ लागू शकतो
वरील दिलेल्या मुद्याचा विचार करून खरड छाटणी वेळी माघे -पुढे येणारया फुटीवरती उपाय योजना करता येऊ शकते